शुक्रवार, 5 जुलाई 2024

भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं?

  

महाराष्ट्र -

भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं? या प्रक्रियेत नवीन बदल काय झाले?


 वर्ग-2 च्या जमिनीचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करायचं आहे. आणि कागदपत्र कोणती लागतात


 सामान्य नागरिकांना भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया काय आहे, गेल्या काही वर्षांमध्ये या प्रक्रियेत नेमके काय बदल झाले आहेत, ते अगदी सोप्या भाषेत समजून सांगायला हवं


 वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं? यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा? नजराणा किती लागतो? याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

वर्ग-2 आणि वर्ग-1 ची जमीन म्हणजे काय?

सातबारा उताऱ्यावर तुमची जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, ते नमूद केलेलं असतं.


भोगवटादार वर्ग-1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.


भोगवटादार वर्ग-2 या पद्धतीतमध्ये खातेदारांना शासनाकडून मिळालेल्या जमिनी असतात. या जमिनींचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही.


यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो.


तर अर्ज कसा करायचा?

8 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्यानं प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करणे) नियम, 2019 राजपत्राद्वारे प्रसिद्ध केला.


या नियमानुसार, ज्या जमिनी शासनानं नागरिकांना कृषिक, रहिवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्कानं अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत, त्या जमिनींचं वर्ग 1 मध्ये रुपांतर करता येतं.


यासाठी तहसील कार्यालयात तहसिलदारांकडे अर्ज करता येतो.


महसूल कायदेतज्ज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांच्या एका लेखात यासाठीच्या अर्जाचा नमुना दिलेला आहे. खालील फोटोत तुम्ही तो पाहू शकता


प्रचलित दरानुसार, नजराणा किती भरावा लागेल ते पाहूया...


कृषिक प्रयोजनसाठी जमीन प्रदान केलेली असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 50 % इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.

वाणिज्यिक अथवा औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्कानं किंवा भाडेपट्ट्यानं धारण केलेली असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 50 % इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.

रहिवासी वापरासाठी कब्जेहक्कानं धारण केलेली जमीन असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 15% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.

रहिवासी वापरासाठी पण भाडेपट्ट्यानं धारण केलेली जमीन असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 25% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.

यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 च्या या नियमानंतर, ज्या नागरिकांनी वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये रुपांतरित केल्यात त्यांना नजराणा भरण्यासाठी 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. आधी ही मुदत मार्च 2022 पर्यंत होती.


कागदपत्रे कोणती लागणार?

वर्ग-2 च्या जमिनीचं 1 मध्ये रुपांतर करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागणार, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही एकदा तहसील कार्यालयात जाऊन त्याबाबत विचारपूस करणं कधीही चां


अर्ज लिंक - अर्ज डाउनलोड लिंक

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें