शनिवार, 21 अक्टूबर 2023

RTI mahiti adhikar Form right to information माहिती अधिकार नमुना

आपल्याला एखाद्या कार्यालयातून माहिती मिळवायची असेल तर आपण माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये माहिती मागवू शकता . माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा त्याचबरोबर त्याचा नमुना कसा मिळवावा यासंदर्भात तुम्हाला माहिती नसेल तर पहा.

अर्ज कसा लिहावा :-

आपल्याला सर्वप्रथम माहिती अधिकार अर्ज मिळवावा लागेल .

१)त्या अर्जामध्ये आपल्याला ज्या कार्यालयाकडून माहिती मिळवायची आहे त्या कार्यालायचे नाव व पत्ता लिहायचा

२) त्यानंतर आपले अर्जदाराचे नाव व पत्ता नमूद करायचा .

३) हव्या असलेल्या माहितीचा तपशील लिहायचा.

एक ) माहितीचा विषय त्यानंतर (दोन) कालवधी संबंधात माहिती हवी असेल तो कालावधी (तीन ) हव्या असलेल्या माहितीचे वर्णन लिहा.

(चार ) आपल्याला माहिती टपालाद्वारे गावी आहे कि व्यक्तीशा हवी हे लिहा.

४) अर्जदार दारिद्ररेषेखालील आहे कि नाही हे लिहा. असल्यासं त्याची घायांकित प्रत जोडा.

त्यानंतर शेवटी अर्जदार सही व ठिकाण आणि दिनांक लिहा.

अश्या प्रकारे आपण अर्ज लिहायचा आहे. आणि ह्या अर्जाची एक प्रत आपण पोहोच म्हणून घेऊ शकता.

माहिती मिळण्यास किती दिवस लागतील :-
आपण अर्ज केलेल्या दिवसापासून ३० दिवसांपर्यंत

माहिती अधिकार अर्ज नमुना